Add parallel Print Page Options

इस्राएलने पराभूत केलेले राजे

12 यार्देन नदीच्या पूर्वेकडील प्रदेशाचा इस्राएल लोकांनी ताबा घेतला होता.आर्णोन खोऱ्यापासून हर्मोन पर्वतापर्यंत आणि यार्देन खोऱ्याच्या पूर्वेकडील सर्व भूभाग त्यांचा होता. त्यासाठी इस्राएल लोकांनी ज्या ज्या राजांचा पराभव केला ते असे.

हेशबोन नगरात राहणारा अमोरी लोकांचा राजा सीहोन. आर्णोन खोऱ्याजवळच्या अरोएर पासून यब्बोक नदीपर्यंतच्या प्रदेशावर त्याची सत्ता होती. त्या खोऱ्याच्या मध्यापासून त्याची हद्द सुरु होत असे. अम्मोन्यांची सीमा याला लागून होती. गिलादच्या अर्ध्या प्रदेशावर सीहोनची सत्ता होती. यार्देन नदीच्या पूर्वेला गालिली सरोवरापासून अराबाच्या समुद्रापर्यंत (मृत समुद्र) एवढ्या भागावर त्याचे राज्य होते. तसेच बेथ-यशिमोथपासून दक्षिणेस पिसगा टेकड्याच्या उत्तरणीपर्यंतचा भाग त्याच्याच हद्दीत होता.

बाशानाचा राजा ओग यांचाही त्यांनी पराभव केला. ओग हा रेफाई लोकांपैकी होता. अष्टारोथ व एद्रई येथे तो राहात होता तसेच, हर्मोन पर्वत, सलका, बाशानाचा सर्व भाग ही त्याच्याच आधिपत्याखाली होता. गशूरी व माकाथी लोक राहात तेथपर्यंत त्याची सीमा भिडलेली होती. अर्ध्या गिलादावर ही ओगची सत्ता होती. हेशबोनाचा राजा सीहोन याच्या प्रदेशाशी हा भाग थांबत होता.

परमेश्वराचा सेवक मोशे आणि इस्राएल लोक यांनी या सर्व राजांचा पराभव केला होता. नंतर तो देश रऊबेनी. गादी आणि मनश्शाचा अर्धा वंश यांना वतन म्हणून दिला होता.

यार्देनच्या पश्चिमेकडील देशांतील राजांचा पराभव इस्राएल लोकांनी यहोशवाच्या नेतृत्वाखाली केला. मग तो देश बारा वंशांमध्ये विभागून यहोशवाने इस्राएल लोकांना दिला. परमेश्वराने द्यायची कबूल केलेली हीच ती भूमी. लबानोन खोऱ्यातील बालगाद आणि सेईर जवळचा हालाक डोंगर यांच्या मधला हा भाग होय. डोंगराळ भाग, पश्चिमेकडील पर्वतपायथा, यार्देनचे खोरे पूर्वेकडील डोंगर वाळवंट आणि नेगेव एवढा भाग यात येतो. हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी लोकांचे वास्तव्य या प्रदेशात होते. इस्राएल लोकांनी पराभूत केलेल्या राजांची यादी अशी:

यरीहोचा राजा बेथेल 1

जवळील आयचा राजा 1

10 यरुशलेमचा राजा 1

हेब्रोनाचा राजा 1

11 यर्मूथाचा राजा 1

लाखीशाचा राजा 1

12 एग्लोचा राजा 1

गेजेराचा राजा 1

13 दबीराचा राजा 1

गेदेराचा राजा 1

14 हर्माचा राजा 1

अरादाचा राजा 1

15 लिब्नाचा राजा 1

अदुल्लामाचा राजा 1

16 मक्के दाचा राजा 1

बेथेलचा राजा 1

17 तप्पूहाचा राजा 1

हेफेराचा राजा 1

18 अफेकाचा राजा 1

लशारोनाचा राजा 1

19 मादोनाचा राजा 1

हासोराचा राजा 1

20 शिम्रोन-मरोनाचा राजा 1

अक्षाफाचा राजा 1

21 तानखाचा राजा 1

मगिद्दोचा राजा 1

22 केदेशाचा राजा 1

कर्मेल जवळच्या यकनामाचा राजा 1

23 दोर पर्वतावरील दोराचा राजा 1

गिलगाल येथील गोयीमचा राजा 1

24 तिरसाचा राजा 1

असे एकंदर राजे 31.